बीड (रिपोर्टर): शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी आज जाहीर करण्यात आले आहेत. रविराज बडे व गजानन कदम या दोघांची जिल्हा युवा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक म्जहणून सय्यद रियाज हमीद यांचीही निवड करण्यात आली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या युवा पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये रविराज प्रकाश बडे, गजानन दामोदर कदम या दोघांची जिल्हा युवा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर सय्यद रियाज हमीद यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाली. उपजिल्हा युवा अधिकारीपदी अभिषेक दिवे, तालुका युवा अधिकारी म्हणून प्रदीप तांबे, विधानसभा समन्वयक म्हणून दत्ता राऊत, माजलगाव विधानसभा कार्यक्षेत्र, माजलगाव युवा अधिकारी म्हणून छत्रपती जाधव, माजलगाव शहर समन्वयक म्हणून अक्षय कळसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.












