पात्रूड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे पुन्हा डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 5 वर्षाच्या मुलाला ताप येत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलाची चाचणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुक्यातील आरोग्य प्रशासन निष्क्रीय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मोमीन अफान आमेर या पाच वर्षीय मुलाला ताप येत असल्याने त्यास माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची रक्ताची चाचणी केली असता सदरील मुलास डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच पात्रूड येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. डासांची वाढलेली उत्पत्ती अणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष यामुळे नागरीकांना विविध आजारांची लागण होत असल्याचे दिसू नयेत आहे. डेंग्यूबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याची मागणी केली जात आहे.