शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी
जाधव तर तालुकाप्रमुखपदी उबाळे
बीड, (रिपोर्टर)ः-शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाप्रमुखपदी संतोष जाधव तर तालुकाप्रमुखपदी मकरंद उबाळे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या यानिवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनकरण्यात येत आहे. शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ह्या तिन्ही पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
संतोष जाधव गेल्या काही महिन्यापासुन शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. त्यांची शिवसेनेच्याउपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांच्याकडे बीड विधानसभा ग्रामीणचा कारभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान, सुनील अनभुले यांची शिवसेना बीड विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती मकरंद उबाळे यांचीही बीड तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या तिन्ही पदाधिकार्यांंच्या निवडी जाहिर करण्यात आल्या आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.