सिरसाळा (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये यंदा पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण होणार आहे. सिरसाळा येथे टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. जलसाठे कोरडे पडले असून टँकरची मागणी होवू लागली. शहरासह ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरीकांचे हाल होवू लागले.
यावर्षी मराठवाड्यात कमी पाऊस पडल्याने पाण्याची टंचाई जाणवणार आहे. सिरसाळा परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा पुरवठा होवू लागला. हे टँकर नागरीक आपआपल्या परिणे स्वखर्चातून आणु लागले आहे. प्रशासनाने शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी केली जावू लागली. अनेक शेतकर्यांच्या विहरीचे पाणी कमी झाले आहे. बोअरही कोरडे पडू लागले आहे. पाण्यासोबतच चार्याचीही टंचाई देखील जाणवत आहे. प्रशासनाने पाणी व चार्यावर लक्ष केंद्रीत करुन नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जावू लागली आहे.












