वडवणी पोलीसात 4 जणाविरोधात गुन्हा
वडवणी (रिपोर्टर):- मोरेवाडी शिवारातील शेत रस्त्याच्या ये-जाणेच्या कारणावरुन एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना मोरेवाडी शिवारात घडली आहे. या प्रकरणी साळींबा येथील तिन व देवळा येथील एक अशा 4 जणा विरोधात वडवणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, महादेव सुखदेव मुंडे रा. चौंडी ता. धारुर ह.मु. सिंदफणा शाळेच्या पाठीमागे वडवणी यांचे शेत मोरेवाडी शिवारात गट नं.234 याठिकाणी आहे. याच शेता शेजारी सदाशिव मोठे यांचे देखील शेत आहे. दि.10 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 4.30 वा. शेता शेजारील शेतकरी सदशिव मोठे यांनी रस्त्याच्या ये-जाणेच्या कारणावरुन भांडणे काढत जिवे मारण्याच्या उद्देशाने महादेव सुखदेव मुंडे यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व शंकर सदाशिव मोठे यांनी मुंडे यांच्या अंगावर मोटारसायकल घालून चापटा बुक्क्याने मारहाण करुन जखमी केले तर शिवकन्या मोठे यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्यासाठी प्रोत्साहीत केले व निळकंठ शिंदे रा. देवळा यांनी लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केली आहे. म्हणून महादेव सुखदेव मुंडे यांच्या फिर्यादीवरुन साळींबा येथील मोठे परिवरातील 3 आणि देवळा येथील निळकंठ शिंदे अशा चार जणांविरोधात वडवणी पोलीसात गुरनं. 28/2024 कलम 307, 279, 337, 338, 323, 504, 506, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या घटनेचा अधिक तपास ग्रेपोउनि राठोड हे करत आहेत.












