गेवराई (रिपोर्टर): गोदावरी पात्रातील उजव्या कालव्यातून मंगरुळच्या बंधार्यामध्ये पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बारा ते तेरा गावातील शेतकर्यांचे कालव्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेकडो शेतकर्यांचा सहभाग आहे.
जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. या कालव्यातून मंगरुळच्या बंधार्यामध्ये पाणी सोडता येते. पण प्रशासनाने अद्यापही या बंधार्यामध्ये पाणी सोडलेले नाही. अनेक वेळा मागणी करून देखील प्रशासन पाणी सोडत नसल्याने आज उजव्या कालव्याच्या गेटवर भोगगाव, मंगरुळ, बाणेगाव, गंगावाडी, राहेरी, बोरगाव, राजापूर, काठोडा, मनुबाई जवळा, सैदल गाव, रामसगाव, शेवता येथील शेतकर्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेकडो शेतकर्यांचा सहभाग आहे.












