वडवणी (रिपोर्टर):- कर्तव्यात कसूर करणे, नियमित काम करण्यास टाळाटाळ करणार्या वडवणी तहसील येथील महसूल सहायक अनिल गायकवाड यांना जिल्हाधिकार्यांनी निलंबित केले आहे. तसेच गायकवाड यांच्या विभागीय चौकशी प्रस्तावीत करण्यात आली आहे.
वडवणी तहसील कार्यालयात महसूल सहायक अनिल गायकवाड हे मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जमाबंदी संकलनाचा पदभार आहे. त्यामुळे त्यांनी रस्त्याची प्रकरणे, तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडील पत्रव्यवहारासोबत ई- चावडीबाबतचा पत्रव्यवहार करणे इत्यादी कामे करणे अपेक्षित आहेत. परंतु गायकवाड हे भूखंडासंबंधित सुनावणीच्या तारखा घेणे, किरकोळ व्यवहाराचा पत्रव्यवहार इत्यादी कामे करत आहेत. आवक-जावक संकलना संबंधित टपाल घेणे आवश्यक आहे. याबाबत वडवणीचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी टपाल घेऊन कार्यवाही करण्याबाबत सूचना देऊनही काम करण्यास महसूल सहायक गायकवाड यांनी टाळाटाळ केली. कर्तव्यात कसूर करणे, कार्यालयात नियमित न येणे, वेळेवर न येणे, कार्यालयातून परस्पर निघून जाणे, मुख्यालय सोडण्यासाठीची परवानगी न घेता किरकोळ रजेचा अर्ज हरजेपटात ठेऊन निघून जाणे असे प्रकार घडले आहेत. विभागीय दुय्यम परीक्षा व महसूल अर्हता परीक्षेचे हॉलतिकीट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले होते.












