परळी (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यातील विविध भागात वेगेवगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येऊ लागले. आज शहरातील ईटके चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे बीड-परळी व गंगाखेड-परभणी या दोन्ही महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने तात्काळ ठोस भूमिका घ्यावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागात आंदोलन करण्यात येत आहे. आज परळी शहरातील ईटके चौकात दहा ते बारा या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परळी ते बीड आणि परळी ते गंगाखेड-परभणी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.












