माजलगाव (रिपोर्टर ) : सरसकट मराठ्यांना सगे सोयर्यासह आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दि.24 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे आदेश समाज बांधवांना दिले होते. त्या अनुषंगाने माजलगावात परभणी टी पॉइंट येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनात येथील सर्व पक्ष संघटनांसह सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या आंदोलनात बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, रमेश आडसकर,मोहन जगताप, नारायण डक, गंगाभिषन थावरे, नितीन नाईकनवरे, बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी नाना मोरे, अंकुश जाधव,धम्मानंद साळवे, मनोज फरके,माणिक दळवे,शेख फेरोज,स.फारूकअण्णा,ईश्वर होके,नारायण होके,यासह सर्व सकल मराठा समाज बांधवांचा, पक्ष,संघटनाचा सहभाग होता.सदरील आंदोलन दोन तास चालले.