वडवणी (रिपोर्टर):- हिवरगव्हाण येथील विजय उर्फ दयानंद लक्ष्मण झोडगे हा विनाकारण गांवातील मराठा समाजाच्या लोकांना दारु पिऊन शिवागाळ करत असल्याची माहिती कळल्यानंतर वडवणी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन समाजावून सांगितले होते.हा प्रकार सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. यानंतर साडे दहा वजण्याच्या सुमारास पुन्हा बौद्ध समाज आणि मराठा समाजाच्या गटात आपआपसत मारमारी झाली यांचे रुपांतर दगडफेकीत झाले आसल्याची घटना घडली आहे.
हिवरगव्हाण येथील लक्ष्मण झोडगे यांच्या घरासमोर बौध्द आणि मराठा समाजाच्या गटामधील लोक आपसात मारामारी करत दगडफेक झाली आहे. तर दोन्ही गटातील लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाठ्या काठ्या घेऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता बिघडून दंगल केली तसेच दोन्ही गटातील लोकांनी ऐकमेकांवर दगडाने मारुन जखमी केले आहे. तर जखमीना वैदयकिय प्रमाणपत्र देऊन उपाचारासाठी पाठवले आहे.तर या प्रकरणात सहाय्यक पोलीस फौजदार गौत्तम भानुदास वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन मराठा समाजातील अनुरथ उर्फ बंडू नाईकवाडे, उत्तेश्वर छञभुज नाईकवाडे, निखिल नाईकवाडे, ज्ञानेश्वर ऊर्फे माऊली नाईकवाडे, किरण नाईकवाडे, नवनाथ उत्तरेश्वर नाईकवाडे, सर्व रा. हिवरगव्हाण व इ तर 5 ते 10 लोक तसेच बौध्द समाजातील लक्ष्मण धर्मराज झोडगे, भारत धर्मराज झोडगे, विजय ऊर्फे दयानंद धर्मराज झोडगे, सोजरबाई धर्मराज झोडगे, आशाबाई भारत झोडगे, लिंबा लक्ष्मण झोडगे सर्व रा. हिवरगव्हाण व ईतर 5 ते 10 लोक अशा दोन्ही गटातील वरील लोकांविरोधात विरोधात कलम 308, 336, 160, 143, 147, 148,149 भादवी सह कलम 135 महा. पोलीस अधिनियम 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.