बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर एस. चोकलिंगम यांची मुख्य निवडणूक अधिकारीपदी निवड करण्यात आली. चोकलिंगम हे बीड येथे जि.प.चे सीईओ म्हणून काही महिने कार्यरत होते.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. बुधवारी अचानक श्रीकांत देशपांडे यांना मुख्य निवडणूक अधिकारी पदावरून हटविण्यात आले. केंद्रिय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव राहुल शर्मा यांनी या संदर्भातील आदेश प्रस्तूत केला. राज्यातील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या नियंत्रणाकाली पार पडते. त्यामुळे या पदाची जबाबदारी महत्वाची असते. देशपांडे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आता त्यांच्या जागी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.