बीड (रिपोर्टर): शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षाच्या वतीने आवाज उठविणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते ड.भाऊसाहेब लटपटे यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेना भवन ला पाठवला असून आष्टी मतदारसंघाच्या महाविकास आघाडीला यामुळे जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे .आपण आष्टीत आपल्या सहकार्यांशी बोलून येत्या दोन दिवसात पुढील राजकीय निर्णय जाहीर करू असे लटपटे यांनी म्हटले आहे .
याबाबत पत्रकात ड.लटपटे यांनी आपण पक्षाचा राजीनामा देत असून आपण स्थानिक परिस्थितीनुसार येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय जाहीर आहोत असे म्हटले आहे .आपण पक्षात कोणावरही नाराज होऊन हे पाऊल उचलले नसून आष्टी मतदारसंघातील राजकीय परिस्थिनुसार आपण हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले .लटपटे यांनी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेचे अस्तित्व आष्टी मतदारसंघात निर्माण केले होते .वेळप्रसंगी प्रस्थापितांना देखील अनेक वेळा त्यांनी टोकाचा विरोध केला .शिवसेनेचा एक महत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख असताना त्यांनी पक्षाचा राजीनामा देणे हा महाविकास आघाडीला देखील धक्का असल्याचे मानले जात आहे . आपण सामान्य लोकांसाठी ज्या पद्धतीने आक्रमक काम केले ते काम आपण पुढे देखील चालू ठेवणार असून मतदारसंघातील लोकांच्या युवावर्गाच्या भवितव्याकरिता व विकासाचे राजकारण करण्याचा दृष्टीकरणातून आपण येत्या दोन दिवसात पुढील निर्णय घेणार आहोत असे लटपटे म्हणाले .












