केज (रिपोर्टर): मांजरसुंबा ते धायगुडा पिंपळा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. केजडी नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम अद्यापही पुर्ण झाले नाही. अर्धवट कामामुळे सतत अपघात होत आहेत. रात्री एक मोटारसायकल पुलाखाली कोसळली. तरुणांनी उडी मारल्यामुळे ते बालंबाल बचावले. पुलाचे काम तात्काळ करण्याची मागणी केज शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
मांजरसुंबा ते धायगुडा-पिंपळा या महामार्गाचे काम एचपीएम कंपनीला देण्यात आले. कंपनीकडून अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. केजडी नदीवरील पुलाचे बांधकाम तीन वर्षातही पुर्ण झाले नाही. काम पुर्ण करावे यासाठी अनेक वेळा केज संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले मात्र याची दकल कंपनीने घेतली नाही. रात्री गावाकडे निघालेल्या तरुणांची मोटारसायकल पुलाखाली कोसळली. तरुणांनी वेळीच उड्या मारल्याने ते बालंबाल बचावले. आता तरी कंपनीने तात्काळ काम पुर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.