पिंपळनेरमध्ये जाहीर सभेचे आयोजन
पिंपळनेर (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या पिंपळनेर परिसरातील विविध गावांना भेटी देत तेथील मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बीड ते नाथापूरपर्यंत अनेक ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून पिंपळनेर येथे सभेचे आयोजन केल्याचे सांगण्यात येते.
गेल्या काही दिवसांपूर्वी लोणी शहाजानपूर येथील भावी डॉक्टराने मराठा आरक्षण मिळत नसल्याचे पाहून लातूर येथे हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. तसे स्टेटस आणि चिठठीही त्याने लिहून ठेवीली होती, त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी उद्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लोणी शहाजानपूर येथे येत आहेत. त्याचबरोबर परिसरातील अनेक गावांना ते भेटी देणार आहेत. उपस्थित मराठा समा बांधवांशी ते संवाद साधणार आहेत. ठिकठकाणी त्यांचे स्वागत होणार असून पिंपळनेर येथे सभेचे आयोजन केले गेले आहे.












