बीड (रिपोर्टर): शहरातील मुख्य ठिकाणी व शहरातील काही भागातील गल्ल्यांमध्ये भाजी मंडी या ठिकाणी रस्त्याचा आणि स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे ठिकठिकाणी कचर्याच्या घानेने नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत शहरातील पथदिवे बंद आहेत. शहरातील सर्व सिग्नल बंद आहेत यामुळे वाहतूक कोंडीला शहरातील नागरिकांना सोमरे जावे लागत आहे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे
नगरपरिषद ने ठीक ठिकाणी इमारती बांधलेल्या आहेत या इमारती ज्या कारणासाठी बांधल्या आहेत त्या कारणासाठी न वापरता त्या तशाच पडून आहेत स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे बांधण्यात आलेली भाजी मार्केट खुले करून तसेच नगरपरिषदेने बांधलेल्या इतर इमारती वापरत आणाव्यात व तेथील नागरिकांना न्याय द्यावा शहरातील मुख्य चौक व शासनाच्या जागेत अतिक्रमण झाले असून या मुख्य जागा नगरपालिका विविध शासकीय कार्यालयाचे आहेत यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असून नगरपरिषदेने तात्काळ हे अतिक्रमण काढावे वरील विषयासंदर्भात आठ दिवसात कारवाई करावी नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या संदर्भात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर उपजिल्हाप्रमुख, जिल्हा समन्वयक संजय भाई महाद्वार, जिल्हा संघटक राजेभाऊ महूवाले, तालुका रतन तात्या गुजर,प्रमुख गोरख अण्णा सिंघण,बीड विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे,शहर प्रमुख शेख निजाम भाई ,विनोद गुंड यांच्यासह पिंगळे गल्ली सह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती