बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनातील रिक्त असलेल्या जागांवर प्रशासनाकडून नियुक्ती देर्याचे काम चालू आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि माजलगाव येथील दोन उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या गेल्या एक महिन्यापूर्वी झाल्या होत्या. काल राज्य शासनाने अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारीपदी दीपक ओजाळे यांची तर माजलगाव येथील उपविभागीय अधिकारीपदी विवेकानंद काळकर यांची नियुक्ती केली आहे.
दीपक ओजाळे हे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत होते तर विवेकानंद काळकर हे अमरावती विभागीय कार्यालयात कार्यरत होते. या दोन्ही अधिकार्यांना विभाग बदलून मराठवाडा विभागात नियुक्त्या दिल्या असून दीपक ओजाळे हे उपजिल्हाधिकारी संवर्गात कार्यरत आहेत. तर विवेकानंद काळकर हेही अमरावती विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गात कार्यरत होते. काल रात्रीच या दोन अधिकार्यांच्या राज्य सरकारने नियुक्त्या केल्या असून त्यांना तात्काळ आपल्या पदावर रुजू होण्याचे आदेश दिलेले आहेत. पैकी अंबाजोगाई या ठिकाणी दीपक ओजाळे हे रूजू झाले आहेत. हे दोन्ही अधिकारी लोकसभा निवडणुकीत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत.