तुमच्या हाताखाली आम्ही काम करावे का? म्हणत गाडी अंगावर घातली
बीड, (रिपोर्टर)ः- तुमच्या हाताखाली आम्ही काम कसे करावे ? असा सवाल उपस्थित करत मुख्याध्यपकालाच दोन शिक्षकांनी रस्त्यावर आडवून मारहाण केल्याची घटना 12 मार्च रोजी पाडळसिंगी हायवेवर घडली. जखमी मुख्याध्यापकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री गेवराई पोलिसांनी मुख्याध्यापकाचा जवाब नोदविला आहे. या मारहाणीच्या घटनेत शिक्षण विभागात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंबादास नारायणकर हे गेवराई तालुक्यातील शेकटा येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. नारायणकर व त्याच शाळेतील शिक्षक नागरगोजे आणि गिरी यांच्यामध्ये जमत नव्हते. तुमच्या हाताखाली आम्ही काम करावे का ? असा प्रश्न हे दोन्ही शिक्षक उपस्थित करत असल्याचे सांगण्यात येते. 12 मार्च रोजी नारायणकर हे पाडळसिंगी मार्गे येत असतांना त्यांना रघुनाथ नागरगोजे व सुभाष गिरी या दोघांनी आडवून त्यांच्या अंगावर गाडी घालून बेदमपणे मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले असुन त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री गेवराई पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवून घेतला.