रोज 40 ते 50 जणांना प्रमाणपत्र मिळू लागले
बीड(रिपोर्टर)ः- जिल्हा रुग्णालयातून जन्म मृत्यु प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी एकच कर्मचारी नियुक्त करण्यात आला होता. त्यामुळे सबंधीतांना लवकर प्रमाणपत्र मिळत नव्हते. या बाबत रिपोर्टरने वृत्त प्रकाशीत केले होते. याची दखल प्रशासनाने घेवून एक कर्मचारी नियुक्त केला आहे. या कर्मचार्यामुळे दररोज 40 ते 50 जणांना प्रमाणपत्र मिळू लागले. प्रमाणपत्र देण्यासाठी टोकन पध्दतीचा अवलंब केला जावू लागला.
जिल्हा रुग्णालयामध्ये जन्म मृत्यु प्रमाणपत्र काढण्यासाठी दररोज अनेक नागरीकांची गर्दी असते. या विभागामध्ये पुर्वी एकच कर्मचारी होता. एका कर्मचार्याला इतका भार झेपत नव्हता. या बाबत रिपोर्टरने वृत्त प्रकाशीत केले होते. याची दखल रुग्णालय प्रशासनाने घेवून आणखी एका कर्मचार्याची नियुक्ती केली. आता या विभागात दोन कर्मचारी झाले असून दररोज 40 ते 50 जणांना जन्म मृत्युचे प्रमाणपत्र मिळू लागले. वेळेवर प्रमाणपत्र मिळण्यासाठी टोकण पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.