बीड (रिपोर्टर) : बीड जिल्ह्यातील सब रजिस्ट्रार कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. अशी माहिती सहाय्यक जिल्हा निबंधक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.
वार्षिक बाजार मूल्य दरतक्ते 1 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध होत असल्याने सबरजिस्ट्रार कार्यालयात मार्च महिन्यात खरेदी खत, साठे खत, इसार पावती, गहाण खत, इत्यादी सर्व प्रकारचे दस्तऐवज नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच विविध सणांच्या मुहूर्तावर सुद्धा घर खरेदीकारांचा कल असतो. महाराष्ट्र शुल्क सवलत अभय योजना 2023 चा दुसरा टप्पा सुरू असून बर्याच पक्षकारांना आर्थिक वर्षात व्यवहार पुर्ण करायचे असल्याने जनतेच्या सुविधेसाठी दि. 23-3-2024 (शनिवार), 24-3-2024 (रविवार) आणि दि. 29-3-2024 (शुक्रवार गुड फ्रायडे), 30-3-2024 (शनिवार), 31 -3-2024 (रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बीड जिल्ह्यातील सर्व सब रजिस्ट्रार कार्यालये नियमित सुरू राहणार असून या दिवशी दस्त नोंदणी करणे व मुद्रांक शुल्क सवलत योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी अशोक आटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्जहटले आहे.