बीड (रिपोर्टर): मार्च एन्डच्या अनुषंगाने प्रत्येक योजनेसाठी आलेला निधी खर्च झाला पाहिजे, या अनुषंगाने उद्या गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी आहे, त्यानंतर लगेचच शनिवार-रविवार असे दोन सुट्ट्या आल्या आहेत. या सुट्टीच्या कालावधीतही जिल्हा परिषदेचे सर्व विभागांचे कामकाज सुरू राहणार असल्याचे परिपत्रक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी काढले आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे नवीन कोणत्याही कामांना मंजुरी नसली तरी जुनी जी कामे सुरू आहेत आणि जी कामे पुर्ण झालेली आहेत अशा सर्व कामांचे बिले निघाले पाहिजेत, अनेक कामांना गेले तीन-तीन-चार-चार वर्षे निधी आला नव्हता, तोही निधी प्राप्त झाला नव्हता. अनेक योजनांचा निधी व्याप्तगत झाला होता. तोही निधी राज्य शासनाकडून प्राप्त करून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे या हेतुने मार्च एन्डच्या अनुषंगाने सलग तीन सुट्ट्या असल्या तरी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनी आपले कार्यालये सुरू ठेवावेत आणि आलेला निधी खर्च करावा, असे परिपत्रक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी काढले आहे.