बीड (रिपोर्टर): डॉक्टर दाम्पत्य बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्णयांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना आष्टी तालुक्यातील धानोरा येथे घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. हनुमंत साहेबराव काकडे हे पत्नीसोबत बाहेरगावी फिरायला गेले होते. या संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने (किंमत 1 लाख 80 हजार व नगदी 30 हजार) असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. काकडे यांनी याबाबत अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.