लिंबागणेश (रिपोर्टर): बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील मध्यवर्ती असलेल्या मारोती मंदिरातील हनुमानाच्या मुर्तीची तोडफोड केल्याचे दररोज सकाळी पुजा अर्चा करण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या निदर्शनास आले.
दगडीमुर्ती असलेल्या शेंदुरयुक्त मुर्तीची तोडफोड करण्यात आल्याचे आढळून आले. डॉ.गणेश ढवळे यांनी नेकनुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांना याविषयी कल्पना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पोलिस उपनिरीक्षक नितिन गुट्टुवार,लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे.संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मारोतीच्या मंदिरात ग्रामस्थांची बैठक घेऊन घटनेविषयी ग्रामस्थांशी संवाद साधत शांततेचे आवाहन करत चौकशी करून संबंधित प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, कल्याण वाणी, विक्रांत वाणी, अँड.गणेश वाणी,राजेभाऊ जाधव, नितीन जाधव, रामदास मुळे,विनायक वाणी, रामदास मुळे , महादेव कुदळे,उमेश जोगदंड, गणपत घोलप, सुखदेव वाणी,कचरू निर्मळ, पत्रकार हरिओम क्षीरसागर, डॉ.गणेश ढवळे उपस्थित होते.