चालकास घेतले ताब्यात
बीड (रिपोर्टर): अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे एका गाडीमध्ये अनाधिकृतपणे दारू येत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील गाडी बसस्थानकासमोर पकडली. यामध्ये विविध कंपनीच्या दारूच्या 414 बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत 74 हजार 490 इतकी आहे. दारूसह गाडी पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एका गाडीमध्ये अनाधिकृतपणे बिअरच्या बाटल्या जात आहे. पोलिसांनी बसस्थानकासमोर सदरील गाडी क्र्र. एम.एच. 12 पी.क्यू. 4972 पकडली. यात विविध कंपनीच्या 414 बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत 74 हजार 490 रुपये आहे. गाडीसह दारू पोलिसांनी जप्त केली. सदरील ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, टिपरसे, पो.उपनिरीक्षक कुरेशी, मुजावर, पठाण, शेख, सारणीकर, रहाडे, राळकर यांनी केली. या प्रकरणी रवींद्र आघाव यांच्या फिर्यादीवरून चालक सागर सुनील यादव (रा. बुंदेलपुरा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.