अंबाजोगाई (रिपोर्टर): विद्यमान खासदार प्रितम मुंडे प्रचार दौर्यावर असताना परवा अंबाजोगाई तालुक्यातल्या राडी येथे त्या आल्या असता त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक मराठा लाख मराठा , चले जाव चले जाव अशा घोषणा गावातील काहींनी दिल्या. गावबंदीसह अन्य बाबींबाबत न्यायालयाने सूचना केलेल्या असताना आणि जिल्हाधिकार्यांचे जमावबंदी आदेश असताना जाणीवपुर्वक खा. मुंडेंविरोधात घोषणा देणार्या 18 जणांरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ विद्यमान खासदार प्रितम मुंडे या प्रचार दौर्यावर आहेत. गावागावांमध्ये जावून त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. 2 एप्रिल रोजी रात्री 8.15 वाजता त्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात आल्या. त्यांची गाडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता तेथील काहींनी खासदारांविरोधात चले जावच्या घोषणा दिल्या. मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांनो चले जाव, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्यानंतर या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गणेश गगणे, विवेक बाळासाहेब गगणे राडी येथील शुभम श्रीरंग गगणे, महेश गगणे, सुशील गगणे, अरुण गगणे, शैलेश गगणे, परमेश्वर गगणे, युवराज कोळगे, बालाजी गगणे, दत्तात्रय गगणे, आदर्श गगणे, श्रीहरी गगणेसह अन्य पाच जणांविरोधात गु.र.नं. 100/2024 कलम 143 भा.दं.वि.सह कलम 135 महारोट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे व जिल्हाधिकारी यांचे आदेश क्र. 2024 गृहविभाग/प्र.का./कार्यवाही /1/मु.पो.क. 1951 सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.