Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडबीडच्या बडे दाम्पत्यावर वाशीजवळ सशस्त्र हल्ला, मारहाण करत लुटालूट, मोटासायकलस्वारामुळे अनर्थ टळला

बीडच्या बडे दाम्पत्यावर वाशीजवळ सशस्त्र हल्ला, मारहाण करत लुटालूट, मोटासायकलस्वारामुळे अनर्थ टळला


हल्लेखोरांमध्ये महिलांचा समावेश, वाशी पोलिसात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) सोलापूरहून बीडकडे निघालेल्या बडे दाम्पत्याच्या गाडीवर अचानक १५ ते २० जणांनी सशस्त्र हल्ला चढवत मारहाण करून नगदी रोकडसह सोने-चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडत असताना रस्त्यावरून जाणार्‍या अन्य दोघांनी सदरचा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्या दोघांवरही प्रचंड हल्ला करून जखमी केल्याची घटना धुळे-सोलापूर हायवेवर वाशीजवळ परवा घडली. या प्रकरणी बीडच्या दाम्पत्याने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यातील १४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते. या दाम्पत्याने आज रिपोर्टर कार्यालयात येऊन आपल्यावरील आपबिती सांगितली. सदरची घटना अत्यंत भीतीदायक असल्याचे घटनाक्रमावरून दिसून येते.


याबाबत अधिक असे की, बीड शहरातील सारडा नगरी भागात श्रध्दा बिल्डींगमध्ये राहणार्‍या वर्षा विशाल बडे व त्यांचे पती विशाल बडे हे दोघे परवा आपली इनेव्हा गाडी (क्र. एम.एच. ४४ पी. ५०५०) मधून सोलापूरहून बीडकडे येत होते. येरमाळा पास केल्यानंतर वाशी फाट्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या गाडीसमोर लाकडी दांडा घेऊन अज्ञात इसम आला. गाडीची स्पीड कमी होताच त्याने काचेवर लाकडी दांडा मारला. गाडी उभा राहिल्यानंतर आसपासच्या झाडात लपून बसलेल्या दोन्ही साईडकडून दहा ते पंधरा दहा ते पंधरा लोकांनी आपल्या हातातील लाकडी दांडे, काठ्या, लोखंडी सळ्या व अन्य शस्त्रांसह गाडीवर हल्ला सुरू ठेवला. बियरच्या रिकाम्या बाटल्या फेकून मारल्या. विशाल बडे यांना गाडीच्या खाली खेचत त्यांना मारहाण सुरू केली. या वेळी वर्षा बडे या मदतीसाठी आरडाओरड करत असताना मोटारसायकलवर जाणारे दोघे जण त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण सुरू केली. मात्र त्यातील एकाने मोठ्या शिताफीने वाशी पोलिसांना फोन केल्यानंतर वाशी पोलीस अवघ्या काही वेळात घटनास्थळी आले. त्यावेळी हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र तोपर्यंत त्यांनी बडे यांच्या खिशातील नगदी सहा हजार रुपये वर्षा बडे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आरेबाडून नेले होते. पोलिसांनी यातील बडे दाम्पत्यासह मदतीस आलेल्या जखमी अशोक भाळवणे यांना उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात दाखल केले. वर्षा बडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात कलम ३९५, ४२७, ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला. यातील अशोक भाळवणे हे हल्लेखोरांना ओळखत होते. त्यामुळे हल्लेखोरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यात लहु काळे, किरण पवार, राहुल पवार, अनिल शिंदे, अशोक शिंदे, नवनाथ पवार, कविता शिंदे, सोनाबाई काळे, आशाबाई काळे, उषा काळे, छाया शिंदे, दुर्गा पवार, चतुराबाई पवार, आशा बाई काळे (सर्व रा. बारलोन, पारधी पिढी) असे आहे. यातील १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची घटना अत्यंत थरारक होती. बडे दाम्पत्याने आपल्यावरील आपबिती रिपोर्टरला सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!