Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडऐन मार्च एन्डमध्ये बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप वैद्यकीय रजेवर

ऐन मार्च एन्डमध्ये बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप वैद्यकीय रजेवर

बीड (रिपोर्टर) मार्च एन्डमुळे जिल्हा परिषदमध्ये सर्व विभागात संचिका निकाल काढण्याची घाई गरबड सुरू आहे. प्रशासनाला प्राप्त झालेला निधी ३१ मार्च अखेर खर्च करावयाचा असतो. अशा मार्च एन्डच्या धामधुमीमध्ये बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे पंचायत समितीचे सर्वच कामकाज खोळंबलेले आहेत.
प्राप्त सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी गटविकास अधिकारी सानप यांना काही शासकीय कामानिमित्त झापझाप झापले. त्याचाच राग मनावर धरून ऐन मार्च एन्डच्या गडबडीत सानप हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. बीड पंचायत समितीला गेल्या दहा वर्षाच्या काळात कायमस्वरूपी गटविकास अधिकारी भेटलेला नाही. मध्यंतरीचा सोळंके यांचा काही कार्यकाळ सोडला तर दहा वर्षापासून बीड पंचायत समितीला प्रभारीच गटविकास अधिकारी असतात. पंचायत समितीचे पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी यांचे आणि गटविकास अधिकार्‍याचे कधीच जमून आले नाही. त्यातच गेवराई येथील कृषी अधिकारी सानप यांना बीड पंचायत समितीचा पदभार देण्यात आला. गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी नियमावर बोट ठेवत काम करणे पसंत केले. मात्र पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ट प्रशासन यांच्यात ताळमेळ न लागल्याने कालपासून प्रभारी गटविकास अधिकारी सानप यांनी वैद्यकीय रजेवर जाणे पसंत केल्यानं पंचायत समितीचा सर्वच कारभार सध्यातरी खोळंबलेला आहे.

Most Popular

error: Content is protected !!