Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडकोविडने पालक गमावलेल्या बालकांना शिक्षणासाठी निधी उपलब्ध

कोविडने पालक गमावलेल्या बालकांना शिक्षणासाठी निधी उपलब्ध


अंगणवाडी सेविकेने बालकांचे अर्ज भरून घ्यावेत-जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी
बीड (रिपोर्टर) कोविड या आजारामुळे ज्या बालकांचे आई वडिल अथवा पालक गमावलेले आहेत, त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी जिल्हा प्रशासनाला साठ लाख रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीतून पालक गमावलेल्या बालकांचा एका वर्षासाठी दहा हजार रूपये शैक्षणिक खर्च अनुदान देण्यात येते. यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांनी या बालकांचे अर्ज भरून घ्यावेत. असे एका प्रसिध्दीपत्रकात जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांनी म्हटले आहे.


कोविड या आजारामुळे बालकांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत २० ऑक्टोबर २०२१ ला सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने या बालकांचा १८ वर्ष वय होईपर्यंत शैक्षणिक खर्चासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे असे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने राज्याच्या महिला आणि बालविकास आयुक्तालयामार्फत बीड जिल्हा प्रशासनाला साठ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कोविड आजारामध्ये ज्या बालकांचे एक किंवा दोन पालक गमावलेले आहेत त्यांना दहा हजार रूपये प्रति वार्षिक शैक्षणिक खर्च अनुदान देण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधीत बालकांचा विहित नमुन्यातील अनुदान मिळण्यासाठीच अर्ज गावातील मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका यांनी भरून तो तालुका संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा कार्यालयातील परिविक्षा अधिकारी निर्मळ मो.९४२३४७०४४६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिला बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!