Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमडोक्यात दगड घालून मजुराचा खून; ढेकणमोहा येथे घडली घटना

डोक्यात दगड घालून मजुराचा खून; ढेकणमोहा येथे घडली घटना

रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी पश्‍चिम बंगालहून आलेले आहेत 11 मजूर
बीड (रिपोर्टर) दारू पिल्यानंतर दोन मजुरात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन नंतर हाणामारीत होऊन झोपेत असलेल्या एका 48 वर्षीय मजुराच्या डोक्यात दुसर्‍या मजुराने दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना ढेकणमोहा येथे घडली. मजूर रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधून आलेले आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीडपासून काही अंतरावर असलेल्या ढेकणमोहा येथे रेल्वे पटरीचे काम सुरू आहे. याचे टेंडर पश्‍चिम बंगाल येथील सुशांत सुनिल मंडल यांनी घेतलेले आहे. काम करण्यासाठी त्यांनी पश्‍चिम बंगाल येथून अकरा मजूर आणलेले आहेत. हे सर्व मजूर ढेकणमोहा येथेच राहतात. रात्री हैदरअली तरफदार पिता अब्दुल होसाईन व सिमूल बिस्वास पिता निपेंद्रनाथ बिस्वास (रा. नारायणपूर, कटलबागल, ता. दत्तपुलिया जि. नादिया (पश्‍चिम बंगाल)) या दोघात वाद निर्माण झाला होता. या वादातून हैदर अली याने शिमूल याच्या नाकावर बुक्की मारली होती आणि त्यातून रात्री शिमूल याने हैदर अली तरफदार पि. अब्दुल होसाईन (वय 48, रा. पश्‍चिम बंगाल) याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. या घटनेनंतर रात्री दोन वाजता शिमूल याने आपण हैदरअली तरफदार याचा खून केल्याची कबुली गुत्तेदार सुशांत मंडल यांना दिली. त्यानंतर याची माहिती मंडल यांनी पिंपळनेर पोलिसांना दिल्यानंतर ठाण्याचे प्रमुख पीआय आघाव, पीएसआय ढाकणे, पीएसआय खरात, कडुळे, बिट अंमलदार गर्जे, सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला प्रकरणाची फिर्याद सुशांत सुनिल मंडल यांनी दिली असून त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!