आरोपी विरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः-बहिणीकडे गेलेल्या एका व्यक्तीच्या घरामध्ये शेजार्यानेच चोरी केली. घरातील नगदी 20 हजार व इतर साहित्य असा एकुण 26 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सुंदर नगर सहकारी कारखाना, कारी शिवाय ता.धारूर या ठिकाणी घडली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ापुराव ज्ञानोबा काळे (वय 50 रा.काळेचीवाडी ता.धारूर ह.मु.सुंदर नगर सहकारी कारखाना कारी शिवाय) हे आपल्या बहिणीच्या गावाला गेले होते. याच संधीचा फायदा उचलुन त्यांच्या शेजारी राहत असलेल्या लक्ष्मण आबासाहे बडे याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील बिशीचे ठेवलेले 20 हजार, एक पितळाची भांडे, नाट्याचे लुगडे असा एकुण 26 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान संबंधित आरोपीने आपल्यावर चोरीचा आरोप केला तर फाशी घेईल अशी धमकी सुध्दा दिली आहे. या प्रकरणी बापुराव काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण बडे यांच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.