गरीबांच्या कष्टातून गड निर्माण झाला
बीड, (रिपोर्टर)ः- मी बोलावं, तुम्ही ऐकावं, एवढा मी मोठा नाही, तुमच्यापेक्षा शहाणा नाही, काय करायचं, काय नाही करायचं हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे नारळी सप्ताहाच्या गडाच्या या पावित्र्याला माझ्याकडून गालबोट लागणार नाही, असे म्हणत राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संतश्रेष्ठ भगवानबाबांनी भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराजांनी साक्षात्कार दिला आणि त्या साक्षात्कारातून आज गड उभा राहिला. अध्यात्म, शिक्षण हे पुढचे हजार वर्षे टिकावे, हा उदात्त हेतू ठेवून गडावर काम होत असूनगरीबांच्या कष्टातून भगवानगड निर्माण झाला. या गडावर संत ज्ञानेश्वरांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहत आहे. हे मंदिर महंत नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. येत्या अनेक वर्षे गडाचे अन् बाबाचे ऐश्वर्य चिरकाल राहणार असल्याचे सांगुन माझ्या जिवनातील शेवटच्या श्वासापर्यंत गरीबांची सेवा करण्याचा आशिर्वाद मी या ठिकाणी मागत असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

भगवान गडाचा नारळी सप्ताह घोगस पारगाव याठिकाणी होता. सप्ताहाची आज सांगता झाली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी ते ोलत होते. पुढे बोलतांना मुंंडे म्हणाले की, अध्यात्माच्या व्यासपिठावर अनेक मंडळी बसलेली आहेत. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखणे हे गरजेचे आहे. गडाचे आणि बाबाचे ऐश्वर्य चिरकाल टिकून राहणार आहे. गोर गरीबांच्या कष्टातून हा गड उभा राहिला. गडावर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहत आहे. हे मंदिर महंत नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. स्व.मुंडे आणि स्व.आण्णा यांची शिकवण आहे की, अध्यात्मासाठी जे केले ते या हाताचं त्या हाताला कळता कामा नये अनेक हात आज अध्यात्मासाठी पुढे येत आहेत. माझ्या जिवनातील शेवटच्या श्वासापर्यंत गोर गरीबांची सेवा करता यावी असा आशिर्वाद याठिकाणी मी मागत असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यानी म्हंटले आहे. काय करायचं आणि काय नाही करायचे हे सगळ्यांना माहित आहे अशी निश्कील टिपणीही त्यांनी यावेळी केली आहे. व्यासपिठावर महंत नामदेव शास्त्री महाराज, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहे आजबे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

सिरसमार्ग सप्ताहास भेट
नारायणगडाचा नारळी सप्ताह सिरसमार्ग येथे सुरू आहे. आज राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सिरसमार्ग येथे जाऊन सप्ताहास भेट दिली. उपस्थित नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी सप्ताह आयोजकांनी ना. मुंडेंचे स्वागत करत हृदयसत्कार केला.










