नांदा गावचे भूमीपुत्र शहीद जवान विष्णु औटे यांना देशसेवेत कार्यरत असताना वीरमरण
आष्टी (रिपोर्टर):-
तालुक्यातील नांदा गावचे भुमीपुत्र शहीद जवान विष्णु रघुनाथ औटे जम्मू काश्मीर येथे देशसेवेत कार्यरत असताना वीरगतीस प्राप्त झाले.अमर रहे, अमर रहे विष्णू औटे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणा देते भारत मातेच्या ह्या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर दि.27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले,आष्टी पोलीस दल व सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजून शहीद जवानास मानवंदना दिली
तालुक्यातील नांदा येथील जवान विष्णु रघुनाथ औटे(66आर्मड रेजिमेंट) हवालदार वय ( 44 ) वर्षे हे जम्मु काश्मिर, कोलकत्ता, बंगलोर, राजस्थान, हरियाणा देशात विविध ठिकाणी 24 वर्ष सेवा केली ,अल्पशा आजाराने कमांडो हॉस्पिटल पुणे येथे 26 एप्रिल 2024 रोजी वीरमरण आले,शुक्रवारी संध्याकाळी माहिती कळताच नांदा गांवासह संपूर्ण पंचक्रोशी शोककळा पसरली नांदा गावातील भुमीपुत्र विष्णु रघुनाथ औटे हे सन 2001 मध्ये आर्मी भरती झाले होते.नांदा गावचा सुपुत्र शहीद झाल्याचे समजताच औटे परिवारांसह पंचक्रोंशीवर दु:खा चा डोंगर कोसळला जवानाचे पार्थिंव शनिवारी सायंकाळी नांदा गावांत पोहोचल्यानंतर पार्थिवाचे कुटुंबिय, नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनांतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली
आष्टी तालुक्यातील व नांदा गावांतील आजी-माजी सैनिक तसेच सर्व नांदा जिप.सदस्य,पं,स,सदस्य,ग्रामस्थ,पोलीस पाटील,सरपंच उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,सर्वच माता बहिणींनी भारत माता की जय,अमर रहे अमर रहे विष्णु औटे अमर रहे! जड अंतकरणाने घोषणा देण्यात आल्या त्यानंतर शहीद जवान विष्णु औटे यांना बीड जिल्हा पोलीस आष्टीचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या सह 8 गार्ड तसेच लष्करी विभागातील 8 गार्ड यांनी तौफांची सलामी देत अखेरची मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा,भाऊ,आई असा परिवार आहे.