बीड (रिपोर्टर): तलवाडा शिवारातील विजेचा पोल अज्ञात लोकांनी पाडल्याने दोन शेतकर्यांच्या उसाला आग लागून यामध्ये जवळपास एक एकर ऊस जळाला आहे. या प्रकरणी पोल पाडणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात वीज वितरण कंपनीने गुन्हा दाखल केला आहे.
तलवाडा शिवारातील मेन लाईटचा विजेचा पोल अज्ञात व्यक्तीने पाडला. सदरील हा पोल पडल्याने ज्ञानेश्वर रामनाथ काळे व सुनिता काळे या शेतकर्याच्या एक एकर उसाला आग लागल्याने यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याप्रकरणी रखमाजी पांढरे यांच्या फिर्यादीवरून पोल पाडणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










