Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडपरळीपरळीत कडकडीत बंद

परळीत कडकडीत बंद


परळी : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात परळीत महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी माकप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, वंचित आघाडी सह आंदोलनाला पाठींबा असणार्‍या विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी ८ वा शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून निदर्शन करण्यात आले.

parrali 4केंद्र सरकारने जाचक असलेला शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने परळी बंदची हाक देण्यात आली आहे. जाचक कायदा रद्द करावा, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी परळी शहर दुमदुमून गेले.

parrali 2

यावेळी माकपचे पी.एस.घाडगे, पांडुरंग राठोड,पी.एस.नागरगोजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाजीराव धर्माधिकारी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, कॉंग्रेसचे बाबु नंबरदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

parrali 3

Most Popular

error: Content is protected !!