हजारोंच्या संख्येनी समाज मुख्य रस्त्यावर उतरला
वडवणी (रिपोर्टर):- ओबीसी तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशिअल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट टाकल्या प्रकरणी आज वडवणी शहर कडेकोट कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येनी सकल ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. यावेळी तहसिल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत आधिक माहिती अशी कि, गेल्या चार पाच दिवसांपुर्वी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन सोशिअल मिडियावर पोस्ट आणि कमेंट करण्यात आली होती. याचच निषेध म्हणून सकल ओबीसी समाजाच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येत आहे. तर आज सकाळपासून वडवणी शहर हे कडेकोट आणि कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी हजारोंच्या संख्येनी सकल ओबीसी समाज एकत्र झाला होता. हातात स्व. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्या प्रतिमेची फोटो घेऊन जनसमुदयाच्या रँलीचे मोर्चात रुपांतर होत तहसिल कार्यालयाकडे रवाना झाले. यामध्ये अमर रहे …अमर रहे… स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब अमर रहे…पंकजा मुंडे तुम आगे बढो हम तुमारे साथ है… यासह अन्य सन्मार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत. तर अशा पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या विरोधात कठोर शासन करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तहसिल कार्यालयासमोर ओबीसी समाजातील नेते मंडळीची भाषणे झाली तर या बंद आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून विशेष खबरदारी म्हणून पोलीसाचा फौजफाटा चार पोलीसांच्या तुकड्या मागविल्या होत्या.यावेळी शहरातीला चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आला होता. तर कधी नव्हे तेवढ्या हजारोंच्या संख्येनी अठरपगड सकल ओबीसी समाजाची विशेष एकजूठ दिसून आली आहे. तर स्व,मुंडे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासह अन्य ओबीसी नेते आणि समाजाला हिनवण्याचा प्रयत्न केला तर सकल ओबीसी समाज देखील जसाचतसे उत्तर देईल अशा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.











