Friday, August 6, 2021
No menu items!
HomeUncategorizedओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


ओबीसींची मुस्कटदाबी बंद करा; ओबीसीमध्ये घुसखोरी नको
बीड (रिपोर्टर): ओबीसींना घटनेने दिलेले आरक्षण धोक्यात आले असून या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी आज ओबीसी बांधवांनी एकत्रीत येवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

s7
s1

हा मोर्चा आज दुपारी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, महात्मा फुले पुतळ्यापासून काढण्यात आला होता.

s2

या मोर्चामध्ये जिल्हाभरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसीमध्ये घुसखोरी नको, लढा ओबीसींचा आरक्षण टिकवण्याचा, ओबीसींची मुस्कटदाबी बंद करा यासह इतर फलक आंदोलनकर्त्यांनी हाती घेवून मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

s3


ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे असे असतांना ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्रीत येत जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला. हा मोर्चा दुपारी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स पासून काढण्यात आला होता.

s4

सदरील हा मोर्चा माजी आ.पंकज भुजबळ, माजी खा.समिर भुजबळ, बापुसाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ऍड.सुभाष राऊत यांनी काढलेला होता.

s5

या मोर्चामध्ये जिल्हाभरातील ओबीसींची उपस्थिती होती.

s6

विशेष करून महिलाही मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!