• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

थोरल्या घरचं चिन्ह, कार्यकर्तेच अनभिज्ञ

by Beed Reporter
July 12, 2022
Reading Time: 1 min read
0
थोरल्या घरचं चिन्ह, कार्यकर्तेच अनभिज्ञ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत । बीड
जिल्ह्याच्या राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या घराण्याकडे पाहितलं जातं त्या क्षीरसागर घराण्याकडे एक-दोन पंचवार्षिक वगळता नगरपालिका स्थापनेपासून सर्वात जास्त सत्ता ही क्षीरसागरांकडे राहिलेली आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची ओळख अध्यक्ष म्हणून होण्याचे कारणही नगरपालिकेतली आजपर्यंतची निर्विवादीत सत्ता होय. अशा परिस्थितीत या राजकीय थोरल्या घराला उद्याच्या निवडणुकीत नेमके काय करायचे आहे हे अद्याप मतदारांनाच सोडा कार्यकर्त्यांनाही माहित नसल्याचे सांगण्यात येते. राज्यातल्या राजकारणासह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात झालेले स्थित्यांतरे आणि थोरल्या घराने घेतलेले राजकीय निर्णय त्या राजकीय निर्णयात राज्य पातळीवर झालेल्या उलथापालथीत पाहता उद्याच्या निवडणुकीत थोरले घर कुठले चिन्ह घेऊन मतदारांच्या समोर जाणार याबाबतची अनिश्‍चितता स्वतंत्र नेतृत्व उभा करू पाहणार्‍या अन्य पक्षांतील अभिलाषी नेत्यांना संधी देणारं.

गेल्या पंचवार्षिकमध्ये राजकीय थोरल्या घरात भाऊबंदकी उफळून आली अन् थोरल्या घराचे दोन स्वतंत्र राजकीय काफिले शहरात तयार झाले. सेक्युलर विचारसरणी घेऊन आजपावेत राजकारण करणार्‍या या थोरल्या घरात सेक्युलर विचार कायम लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी दोन्ही काफिल्यांनी तेव्हा सुरुवात केली. मात्र नेतृत्वाने एका काफिल्याला कायम रसद पुरवणं सुरू ठेवत जो काफिला निष्ठेचा आहे त्याकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादीचं हे वागणं थोरल्या घरचे थोरले जयदत्त क्षीरसागरांना पटलं नाही. गेल्या नगरपालिका निवडणुकीत जयदत्त क्षीरसागरांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवली तर थोरल्या घरातून विभक्त झालेले संदीप क्षीरसागरांनी काकु-नाना आघाडी उघडली. ती निवडणूक दोघांसाठीही अस्तित्व दाखवणारी ठरली. संदीप क्षीरसागरांनी 20 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले खरे मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थोरलं घर वरचढ ठरलं. इथपर्यंत सर्वकाही ठिक असताना विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने जयदत्त क्षीरसागरांपेक्षा संदीप क्षीरसागरांना महत्व देत उमेदवारी दिल्यानंतर क्षीरसागरांनी थेट शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेच्या धनुष्यावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत क्षीरसागरांना पराभव स्वीकारावा लागला तर संदीप क्षीरसागर सारख्या तरण्याताठ्या युवा नेत्याला बीडचं नेतृत्व करण्याचं सौभाग्य मिळालं. मात्र नंतर पाच वर्षांच्या कालखंडात थोरलं घर विरुद्ध थाकल्या घराचं वारस यांच्यात बरच काही घडलं. संदीप क्षीरसागरांचं नेतृत्व स्वीकारून आघाडीत लढलेल्या नगरसेवकांनी संदीप क्षीरसागरांविरोधातच आक्रमक धोरण आखलं अन् संदीप क्षीरसागरांचं नेतृत्व नाकारत पुन्हा थोरलं घराचं नेतृत्व अंगीकारलं. मात्र या कालखंडात शिवसेना पक्षात डेरेदाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागरांना कडवट शिवसैनिकही होता आलं नाही अन् निर्पेक्ष नेतृत्व घेऊनही जनतेसमोर थेट जाता आलं नाही. आता नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत राजकारणातलं हे थोरलं घर जनतेसमोर शिवसेनेचं चिन्ह घेऊन जाणार का? यावर अद्यापही मतदारांना सोडा कार्यकर्त्यांनाही माहित नाही. त्यात राज्यपातळीवर शिवसेनेत झालेली अंतर्गत बंडाळी उभं राहिलेलं सर्वात मोठं बंड पाहता जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेणार? ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार की, (पान 7 वर)
बंडखोर एकनाथ शिंदेंसोबत जाणार ? याबाबतही गेल्या पंधरवाड्यात त्यांच्याकडून प्रतिक्रिया थेटपणे कुणालाच मिळाली नाही. बीडचं राजकारण हे कधीही कुणाला लक्षात आलं नाही ते थोरल्या क्षीरसागरांना कायम लक्षात आलेला आहे. कुठल्या वार्डात कुठली भूमिका घ्यायची इथपासून कुठल्या घरातलं मत कुठे जाणार इथपर्यंत इत्यंभूत माहिती ठेवणारे थोरले क्षीरसागर नगरपालिका निवडणूक घोषीत झाल्यानंतरही चिन्हा बाबत शांत दिसतात तेव्हा कार्यकर्ते प्रचाराची सुरुवात अथवा निवडणुकीची व्यूहरचना आखण्याची सुरुवात तरी कसे करतील. क्षीरसागर हे सेक्युलर आहेत, बीडमध्ये मुस्लिमांसह अन्य सेक्युलर विचाराचा मताचा मोठा गठ्ठा आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या चिन्हावर विजयश्री खेचता येईल का? की आघाडी करावी लागेल? या द्विधामन:स्थितीत सध्यातरी थोरलं घर दिसतय. अशा स्थितीतही त्यांनी वारस म्हणून या निवडणुकीत डॉ. योगेश क्षीरसागरांना गेल्या काही दिवसांपुर्वीच लाँच केले आहे. आता योगेश क्षीरसागर हे शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतात की, आघाडीच्या जोरावर निवडणूक लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous Post

वार्ड 26, नगरसेवक 52, भाजपाच्या बैठकीला पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते 54, अनेकांचा निवडणूक लढवण्याबाबत नकार; मस्केंच्या नेतृत्वात भाजपाची प्रगती का अधोगती?

Next Post

जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच, नवीन निवडणुका जाहीर न करण्याच्या सूचना

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवाळ, अजय चौधरी यांना नोटीस, ११ जुलैला पुढील सुनावणी

जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच, नवीन निवडणुका जाहीर न करण्याच्या सूचना

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?