आष्टी (रिपोर्टर): शेतात खुरपणीसाठी जाणार्या महिलेस रस्त्यामध्ये अडवून तिला चारचाकी गाडीत बसवून पुणे येथे नेत त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य दोघा जणांविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील हे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील लिंबगाव येथील आहेत.
आष्टी तालुक्यातील एका वस्तीवर राहणारी 25 वर्षीय महिलेस शेतामध्ये जात असताना सदरील महिलेस बिरू वाघमोडे (रा. लिंबगाव ता. म्हाडा जि. सोलापूर) याने रस्त्यात अडवून सदरील महिलेस गाडीमध्ये बसण्यास भाग पाडले. या महिलेस पुणे येथे नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी महिलेने अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार मुख्य आरोपी बिरू वाघमोडे सह मदत करणार्या अन्य दोन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ाााााााााा