वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यात शासकीय कापुस खरेदी केंद्र एकच चालु आहे. ते ही आठवड्यातुन एकच दिवस असून सदरील केंद्र रोज आणि सुरळीत सुरु करावे तसेच सोयाबीन केंद्रात बारदाणा उपलब्ध करून द्यावा व एसबीआय बँकेकडुन शेतकर्यांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन द्यावे यासह अन्य मागण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आछ वडवणीत रास्ता रोको करण्यात आला आहे.
वडवणी तालुक्यातील शेतकर्यांच्या कापसाचे सीसीआय कापुस खरेदी केंद्र वडवणी तालुक्यात लोणवळ येथे एकच आहे. तेही आठवड्यातून बुधवार या एकाच दिवशी चालू असते. त्यामुळे शेतकर्यांना नाईलाजाने आपला कापूस व्यापार्यांना कमी दराने द्यावा लागतो. लोणवळ येथील सीसीआय शासकीय खरेदी केंद्र नियमित आठवडाभर सुरू करावे, वडवणी येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याचे कारण सांगत सोयाबीन केंद्र बंद आहे या सोयाबीन केंद्राला बारदाना तात्काळ उपलब्ध करून द्यावा तसेच वडवणी येथील एसबीआय बँकेत पीक कर्जासाठी अडवणूक केली जात आहे. ते अडवणूक न करता तात्काळ शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे यासह अन्य मागणीसाठी वडवणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी वडवणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन दिले आहे. या वेळी तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन लंगडे, नगराध्यक्ष शेषेराव जगताप, जि. प. सदस्य औदुंबर सावंत, अँड. राज पाटील, दिनकर करांडे, महादेव आंभुरे, अभिमन्यू कदम, अशोक आप्पा निपटे, वैभव मस्के, विश्वासराव आगे, अँड. प्रदीप शेळके, डॉ. दुधाने, सरपंच अँड माधव शेंडगे, अंगद घुगे, गोकुळ गवारे, सोमेश्वर टीळे, रामकृष्ण बादाडे, सतीष खोटे,राजेभाऊ लंगे,अमरसिंह मस्के,विश्वनाथ शिंदे, गोविंद बादाडे, बालासाहेब राऊत, शाम जाधव, राहुल चिंचकर, माऊली नाईकवाडे,आदींनी केले आहे.










