———-
————–
गेवराई (रिपोर्टर ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात गस्त घालत असतांना महसूल पथकातील मंडळ अधिकारी पखाले यांच्यावर राक्षसभूवन रोडवर काही वाळू माफियांनी हल्ला केला असून सदरची घटना ही मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन फाटा येथे घडली. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा ही नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राक्षसभूवन परिसरात रात्री गेवराईचे महसूल पथक गस्तीवर होते तसेच दोन जण मंडळ अधिकारी पखाले यांचा पाठलाग करत होते ते राक्षसभूवन रोडवर त्यांनी त्यांना विचारले की माझ्या मागे का?फिरता अशी विचारना करताच मंडळ अधिकारी पखाले यांना मारहान करण्यास सुरूवात केली तसेच या प्रकरणात एकूण पाच आरोपी असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती रात्रीच जिल्हाधिकार्यांना झाली. सुत्रांच्या माहितीनुसार जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे घटनास्थळावर पोहचले. त्यावेळी उपस्थित पथकातील अधिकार्यांनी त्यांना घटनेची माहिती सांगितली. या प्रकरणी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकार्यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार तालुकाबाहेर असल्याचे लक्षात आल्यानंतर पाठक यांनी तहसीलदारांना चांगलेच झापल्याचे सांगण्यात येते. तुम्ही हप्तेखोरी करता म्हणून वाळू माफियांची मारहाणीपर्यंत मजल जाते. ज्या पद्धतीने तहसीलदारांना कानपिचक्या दिल्या त्याप्रमाणेच उपस्थित पथकालाही जिल्हाधिकारी पाठक यांनी खडेबोल सुनावले. सरशेवटी या प्रकरणातील आरोपींवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










