गेवराई (रिपोर्टर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबूनाईक तांडा या ठिकाणी हंगामी वस्तीग्रह योजनेअंतर्गत भोजन शिबिरास भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी अचानक भेट दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थी स्थलांतरित होऊ नयेत शिक्षणापासून वंचित राहू नयेत ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील ऊस तोडणी,वीटभट्टी किंवा इतर कामासाठी इतरत्र गेलेले असतील त्यांच्या मुलांसाठीसाठी चार महिने हंगामी वस्तीग्रह योजना राबवली जाते अंबूनाईक तांडा या ठिकाणी 1 डिसेंबर 2024 पासून हंगामी वस्तीग्रह व्यवस्थितपणे सुरू आहे. यापूर्वी वेळोवेळी पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत तपासणी केलेली आहे, आज फुलारी साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच भगवान सोनवणे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी सकाळी ठीक नऊ वाजता अंबूनाईक तांडा या ठिकाणी अचानक वसतिगृहासाठी भेट दिली असता शाळेत स्थलांतरित झालेल्या पालकांची मुले बाजरी भाकरी वांग्याची भाजी भात जेवताना दिसून आले. परिसर स्वच्छ दिसून आला यावेळी शाळेवर मुख्याध्यापक अण्णासाहेब लोणकर सहशिक्षक अण्णासाहेब ढेरे उपस्थित होते या भेटीच्या वेळी जेवणाचा दर्जा उत्तम दिसून आला म्हणून या योजनेअंतर्गत चालणार्या वस्तीग्रहाचे फुलारी साहेबांकडून कौतुक करण्यात आले.









