बीड (रिपोर्टर): सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन वंजारी समाजाबाबत गैरवक्तव्ये केले. या वक्ताव्यांबद्दल समाजात संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्याच्या संदर्भात अॅड. रत्नाकर चौरे यांनी दमानिया यांना नोटीस पाठविली. या नोटीशीचे उत्तर पंधरा दिवसांच्या आत न दिल्यास 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा देणार असल्याचे चौैरे यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीड जिचल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी दमानिया या बीड येथे आल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील केले होते. दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन वंजारा समाजाबाबत गैरवक्तव्ये केले होते. प्रशासकीय सेवेमध्ये एवढे मोठे वंजारी समाजाचे लोक कसे?यासह अन्य प्रश्न उपस्थित करत त्यांनी वंजारी समाजाचा अवमान केला होता. या अवमानाप्रकरणी अॅड. रत्नाकर चौरे यांनी दमानिया यांना नोटीस पाठविली. पंधरा दिवसांच्या आत उत्तर न आल्यास दमानिया विरोधात पाच कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे अॅड. चौरे यांनी म्हटले.









