बीड (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जालना जिल्ह्यातील एका 24 वर्षीय मुलाशी विवाह होत असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चाईल्ड लाईनची मदत घेऊन पोलिसांनी तो रोखत मुलीसह मुलाच्या आई-वडिलांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले.
बीड (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जालना जिल्ह्यातील एका 24 वर्षीय मुलाशी विवाह होत असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चाईल्ड लाईनची मदत घेऊन पोलिसांनी तो रोखत मुलीसह मुलाच्या आई-वडिलांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले. दिंद्रुडमध्ये बालविवाह होत असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील सरपंच, ग्रामसेवक यांना माहिती देऊन याची खात्री केली व बालविवाह होण्यापुर्वीच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी जावून बालविवाह रोखला. धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील 16 वर्षीय मुलीचा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी या गावच्या 24 वर्षीय तरुणासोबत होणार होता. ही कारवाई दिंद्रुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, अंगणवाडी सेविका कुरळे, चाईल्ड लाईनचे रामहरी जाधव, संगीता भराड यांनी केली.








