बीड (रिपोर्टर)- बीड नगर पालिकेने गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण हटवण्यास सूरूवात केली. दररोज कुठल्या ना कुठल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात आहे. काही ठिकाणी अनाधिकृत व रस्त्याच्या बाजुला होल्डींग लावण्यात आलेल्या आहे. अशा होल्डींगवरही न.प.ने जेसीबी चालवला. डि.पी. रोडवरील अतिक्रमणावर हतोडा चालवण्यात आला.
शहरातील नगर रोड, जालना रोड, बार्शी रोड, शाहू नगर, पांगरी रोड, गांधी नगर, यासह अन्य भाागातील अतिक्रमाणावर हातोडा चालवण्यात आला. काही ठिकाणी अद्यापही अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण हटवण्यात येवू लागले. गिरी हॉस्पीटलच्या परिसरातील रोडवर अतिक्रमण हटवण्यात आले. तेथील अनाधिकृत होल्डींगही लावण्या आली होती. त्यावरही जेसीबी चालवण्यात आला. जे पक्के बांधकाम केलेले होते त्यावरही जेसीबी चालवण्यात आला आहे. अतिक्रमण हटाव मोहीम न.प.ने सुरूच ठेवली आहे.









