बीड (रिपोर्टर): शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांकडून नेहमीच गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. इतकच नव्हे तर पत्रकारांना अयोग्य वागणूक उद्धट बोलणे याची प्रचिती नेहमीच येत असते. पोलीस अधिक्षक नवनीत यांनी पोलीस अधिकार्यांना मोबाईल आणि सिम कार्ड देऊनही कधी कधी त्यांचा नंबर लागत नाही. किंवा लागल्यानंतर तो रिसिव्ह करण्यात दिरंगाई केली जाते.
बीड शहरातील गुंडागर्दी अवैध कारवाया या नेहमीच होत असतात. आयपीएस नवनीत काँवत यांच्याकडून याची दखलही घेतली जाते. पण जेव्हा केलेल्या गुन्ह्याची प्रत घेण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी नेहमीच बीड शहरातील पोलीस स्टेशन येथील कर्मचारी दिरंगाई करतात. एका गुन्ह्याची प्रत माहिती देण्यासाठी एक एक तास विलंब करायला भाग पाडतात. याचा अनुभव नेहमीच येत असतो. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या स्थानावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे अग्रेसरच आहे. असे नेहमीच दिसून येते. काही कर्मचार्यांच्या उद्धट बोलण्यामुळे सर्वच शिवाजीनगर पोलीस स्टेशन कर्मचार्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. जशी पाच बोटे सारखी नसतात तसेच सर्व कर्मचारीही सारखे नसतात. पण काही कर्मचारी यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या फुकटचा असलेल्या स्वाभिमान आणि अभिमानामुळे नेहमीच पोलिस यंत्रणा पोलीस कर्मचारी यांच्यावर सामान्य नागरिकांकडून पत्रकारांकडून राजकारण्यांकडून शिंतोडे उडवले जातात. इतकंच नव्हे तर ज्येष्ठ पत्रकारांना सुद्धा या उद्धट वर्तणुकीचा सामना नेहमीच करावा लागतो. आयपीएस नवनीत सरांनी या काही कर्मचार्यांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल शिकवण द्यावी. अशी मागणी पत्रकारांकडून आणि सामान्य जनतेकडून होत आहे. गुन्ह्यांची माहितीच जर का पोलीस कर्मचार्यांकडून मिळत नसेल तर सामान्य नागरिकांना बीडची गुंडागर्दी बीडच्या अवैद्य कारवाया कळतील तरी कशा? पत्रकार जेव्हा आयपीएस नवनीत सरांच्या ऑफिसमध्ये जातात, तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा ते आदराने भाषा वापरतात पण काही कर्मचार्यांच्या उद्धट बोलल्यामुळे चहापेक्षा किटल्या गरम ही म्हण खरी उतरते हे पाहायला मिळते.










