बीड (रिपोर्टर): बीड बसस्थानक परिसरामध्ये एक 50 वर्षीय अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला होता. सदरील इसमाची काही तास ओळख पटली नव्हती. मात्र काही तासानंतर त्याची ओळख पटली असून त्याचे नाव काशीनाथ रामकिसन मस्के (रा. वरवटी) असल्याचे समोर आले. मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. प्रथमदर्शनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.








