बीड शहरातील बार्शी नाका भागातील घटना
बीड (रिपोर्टर): संतोष एकनाथ जाधव वय 40 वर्ष राहणार बार्शी नाका हा तरुण मागील काही वर्षापासून इंडियन गॅस एजन्सी मध्ये मागील 20 वर्षापासून मॅनेजर म्हणून काम करत होता.आज सकाळी एजन्सी मधील एका केबिनमध्ये संतोष जाधव यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने पेठ बीड पोलीसांना याची माहिती दिली असता,तत्काळ पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. संतोष जाधव हे अनेक वर्षापासून मॅनेजर व बार्शी नाका भागातील रहिवासी असल्याने सर्वपरिचित होते.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने मित्रपरिवार व नातेवाईकात हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.








