केज शहरातील घटना

केज, (रिपोर्टर) ः पायी जाणार्या एका शासकीय कर्मचार्यास भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने जोराची धडक दिल्याने या अपघातात सदरील कर्मचारी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी भवानी चौकात घडली.
तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असणारे हजारे भास्कर हे सकाळी भवानी चौकातून पायी जात होते. पाठीमागून येणार्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये हजारे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. या घटनेने केज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.





