• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अग्रलेख 

by गणेश सावंत
April 24, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

ते डोकं ठेचलं पाहिजे
देखोनिया हरकले अंड, पुत्र झाला म्हणे रांड तव तो चाटाळ चोरटा सिंदळ असे काहीसे वर्णन त्या वड्या वगळीची पैदास असलेल्या षंड अतिरेक्यांचे करावे लागेल. त्याच्या आईच्या उद्रातून ही पैदास जेव्हा जन्माला आली असेल. तेव्हा त्या आईने त्याचे अंड पाहितले असेल. तेव्हा ती प्रचंड सुखावली असेल. पुत्र झाल्याचा आनंद तिच्या गगणात मावला नसेल,परंतू तोच पुत्र जेव्हा चाटाळ, चोरटा, शिंधळ निघतो. आल्या -गेलेल्यांना पिडा करतो, तेव्हा मात्र त्या मातेला वाटले असेल जन्म झाल्याबरोबर त्याच्या नरड्यावर पाय का दिला नाही. अशा नराधमाच्या नरड्याला नख का लावलं नाही. पहेलगाम मध्ये ज्या पध्दतीने नपुंसक असलेल्या अतिरेक्यांनी 27 निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून निर्घण हत्या केली. नाव विचारून, धर्म विचारून ज्या पध्दतीने गोळ्या घातल्या. त्यावरून ही पैदास माणसाची पैदास नव्हे, तर सैतानाची पैदास असायला हवी. इथे अखंड हिंदूस्तानात आठरा पगड जाती आणि कित्येक धर्म, गेल्या कित्येक वर्षापासून वसलेले आहेत. माणूस जात सर्वश्रेष्ठ जात मानत जो तो आपला धर्म अभिमान आपल्या अंगणात सांभाळून आहे. गेल्या कित्येक दशकापासून तोडा आणि फोडाचं राजकारण करू पाहणारे याच धर्म अभिमानाला एकमेकांच्या अंगणात घूसखोरी करावयास फुस लावतात. ज्या पध्दतीने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू राजकीय असतो, त्या प्रमाणेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा अतिरेकी असतो. हे ही काल  त्या नराधमांनी उभ्या हिंदूस्तानाला दाखवून दिले. 27 निष्पापांची हत्या करणार्‍या त्या नराधमांच्या नरड्याचा घोट घेतलाच जावा, अशी अखंड हिंदूस्तानातल्या 140 कोटी जनतेची इच्छा आज उफाळून आलीय. जो तो घटनेचा निषेध तर करतोच, परंतू


घर मे घुस कर मारेंगे
केंद्र सरकारच्या या घोषणेची आठवण ही करून देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, जेव्हा-केव्हा पाकिस्तानचा विषय आला असेल. तेव्हा तेव्हा आपल्या 56 इंचाच्या छातीचा जणू आम्ही कोट करतोय. या आवेषात हे बोलतात, दुर्देव याचं वाटतं पहेलगाम मध्ये अतिरेक्यांनी जो हल्ला केला. त्या वेळेस भारताची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? हा हल्ला होणार याची कानकुन इंटेलिजन्स ब्युरो ला का मिळाली नाही? ज्या ठिकाणी हा हल्ला झाला. त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हल्ला करणारे नराधम ज्या आवेषाने गोळ्या झाडत होते आणि आमचे निष्पाप भारतीय रक्ताच्या थारोळ्यात पडत होते. तेव्हा त्या नराधमाच्या गोळीला गोळीने उत्तर देण्यासाठी आमचा एकही जवान त्या ठिकाणी का नव्हता? आमची गुप्तचर यंत्रणा इतकी कुचकामी झालीय का ? की आम्हाला एवढा मोठा हल्ला होणार याची साधी भनकही लागू नये. मग काय अर्थ आहे जागतिक महासत्तातेचे स्वप्न पाहण्यात. काय अर्थ आहे त्या 56 इंच छातीचा… इथं सर्व सामान्य माणसाच्या जान आणि मान ची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असते. आमचा मान तर उध्दवस्त होतोय. आता आमची जान ही त्या षंड अतिरेक्यांच्या बंदुकीच्या टोकावर आहे का? हा सवाल आमचा नाही, अखंड हिंदूस्तानचा आहे. हा संताप आमचा नाही, अखंड हिंदूस्तानचा आहे. होय… त्या षंडांनी गोळ्या घातल्या, नपुसक साले, हिंमत असेल तर आमच्या एका भारतीय सैनिकासमोर यांनी उभे राहुन दाखवावं. चड्डी पिवळी आणि ओली झाल्याशिवाय राहणार नाही. याची खात्री अखंड भारतीयांना आमच्या फौजे बाबत आहे. मात्र त्याच


फौज मध्ये कपात
केंद्र सरकारने केल्याचे सांगितले जाते. अग्निवीरच्या माध्यमातून फौजेमध्ये नवीन भरती पध्दत आणली. 1 लाख 80 हजारांच्या आसपास फौजेत कपात केल्याचे एका रिटायर्ड मेजरने अखंड हिंदूस्तानाला कालच टेलिव्हजनवरून सांगितलं. देश सुरक्षित असेल तर देशातला माणूस हा सुरक्षित असतो. मात्र इथं फौजेत कपात केली जाते. हे पाप कोणाचे ? त्यामुळे जेवढा संताप त्या अतिरेक्यांच्या कुकर्माचा आहे तेवढाच संताप या देशवासियांना राजकारणाचाही आहे. आम्ही पुन्हा एकदा म्हणू आमच्या इंटेलिजन्स ब्युरो एजन्सी नेमक्या काय करत होत्या? असो… ही वेळ सरकारवर भाष्य करण्याची नाही. ही वेळ आहे सरकारच्या पाठीशी उभा राहण्याची. होय… अतिरेकी व्यवस्था ही समूळ नष्ट करण्यासाठी अवघा देश तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता त्या हरामाखोरांना सोडू नका, त्या नरभक्षकांचे रक्त सांडलेच पाहिजे. त्यांच्या नरडीचा घोट घेतलाच पाहिजे. ही अखंड हिंदुस्तानच्या तमाम सर्व सामान्य माणसांची भावना आहे. ज्या पध्दतीने पहेलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. तो हल्ला मुडदे पाडण्याबरोबर


धर्मद्वेष
पसरवण्यासाठी ही आहे. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अतिरेकी पोलिसांच्या वेशात आले, हिंदू एकीकडे आणि मुस्लिम एकीकडे व्हा, अशा सुचना दिल्या. जो कोणी प्रश्‍न विचारेल त्याच्या डोक्यात गोळी घातली. काही महिलांना तुला सोडून देतो तू निघून जा… असं त्या नराधमांनी म्हटलं. असे एक ना अनेक संवाद आता त्या भयचक्रातून बाहेर पडलेल्या पर्यटकांच्या मुखातून ऐकायला येतात. त्यातून स्पष्ट होते, या लोकांनी आधी विचारपुर्वक पुरूष मारले. तेही त्यांच्या पत्नीसमोर, मुलीसमोर अशा वेळी या घटनेतून त्या महिलांच्या डोक्यामध्ये मरेपर्यंत एकच विचार राहिल. आम्ही हिंदू आहोत म्हणून मुस्लिम अतिरेक्यांनी आमचे करते पुरूष मारून टाकले… हा आहे धर्मद्वेष… आणि तो यथोयुचित भारतीयांच्या मनामनामध्ये रूजविण्यासाठी या अतिरेक्यांनी हा षंडपणाचा हल्ला केला. आज आमच्या पायाखाली आग आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हाताच्या मुठी वळल्या जात आहेत. संतापाने मस्तकाच्या नसा ताणल्या गेल्या आहेत. कुठल्याही क्षणी अतिरेक्यांचे मुडदे पाकिस्तानात घुसून पाडण्याची जो तो भाषा करत आहे. हा संताप केवळ आणि केवळ निष्पाप लोकांची अतिरेक्यांनी हत्या केली एवढ्यासाठीच…. हा संताप आता सरकारने स्वतः पाळला पाहिजे आणि योग्य वेळी


पाकिस्तानला धडा
शिकवलाच पाहिजे. हल्ला झाला त्यानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. 1960 चा पाणी करार रद्द केला. पाकिस्तानी नागरीकांचे व्हिजा रद्द केले, कटारा बोर्डर सिल केली आणि अन्य काही ठोस निर्णय सरकारने घेतले. हे अंतरराष्ट्रीय निर्णय म्हणा अथवा राजकारण म्हणा एवढ्या पर्यंत ठिक परंतू या भारत मातेचे 27 सपुत त्या पहेलगामच्या धर्तीवर धारातिर्थ पडले. त्यांच्या मृत्यूचा हा बदला असूच शकत नाही… त्यासाठी सर्जिकल स्ट्राईकच व्हायला हवी. सहिष्णूता कुठपर्यंत पाळायची हा आमचा सवाल नाही, या देशातल्या अखंड हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई यांचा आहे. खरं पाहिलं तर 140 करोड जनता पाकिस्तानच्या सिमेवर गेली आणि त्या ठिकाणी या भारतीयांनी नुसती ‘सु-सू ’ ही केली तरी पाकिस्तान वाहून जाईल. एवढीशी ‘औकात’ असलेल्या या नापाक पाकड्यांनी जो हैदास सुरू केलाय त्या हैदोसाचा बदला नक्कीच हवा.यातून कोणी जर राजकारण करत असेल आणि


धर्म अभिमानाचे गोडवे
कोेणी गावू पाहत असेल तर आमच्या दृष्टीने त्याच्या सारखा नतदृष्ट तो तोच… संसदेमध्ये छाती ठोकपणे 2014 पासून काश्मिर खोर्‍यात एकही हल्ला झाला नाही असे म्हणणार्‍यांनी कारगिल, अमरनाथ, संसद, अक्षरधाम हे हल्ले भाजप सत्तेत झाले. तेव्हा मोदी पंतप्रधान नव्हते मात्र त्यानंतर पठाणकोट 2 जानेवारी 2016 आणि त्याच वर्षी ऊरी 18 सप्टेंबर 2016 रोजी थेट लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. पुढे बारामुल्ला 3 ऑक्टोंबर 2016 त्यानंतर 11 जुले 2017 साली अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यात आला त्यानंतर पुलवामा हा सर्वात मोठा हल्ला 14 फेब्रुवारी 2019 रोजी अतिरेक्यांनी केला आणि या दहा वर्षातला सर्वात मोठा हल्ला म्हणुन ज्या हल्ल्याकडे पाहितले जाते तो हल्ला गेल्या दोन दिवसापुर्वी झाला. अतिरेकी हे अतिरेकीच असतात. मग ते हिंदू असोत या मुस्लिमान… ती एक राक्षसीवृत्ती आहे, ती एक सैतानी पैदास आहे आणि ती पैदास मु तोड जवाब मिलेगा…. यातून संपुष्टात येणार नाही. घर मे घुस के मारेंगे… एवढं म्हणूनही चालणार नाही तर तिथं थेट उत्तर हवंच. आता कुठं


काश्मिर स्वर्गा सारखं
भासू लागलं होतं. तिथल जनजिवन पुर्णतः पटरीवर येत होतं. 370 कलम हटविल्यापासून जम्मू-काश्मिरात बराचसा फरक जाणवतोय. सरकार काम करतंय, तेथील अर्थव्यवस्था मजबुतीच्या दिशेने जातेय तोच त्या षंड अतिरेक्यांंनी निष्पाप पर्यटकांची ज्या निर्घणपणे हत्या केली त्यातून तेथील पर्यटनावर परिणाम होणार. परिणामी अर्थव्यवस्था पुन्हा खिळखिळी होणार. तेथील पर्यटन हेच जिवनवाहिनी असल्याने काश्मिरी लोकांची हाल अपेष्टा होणार हा जो उद्देश ठेवून अतिरेक्यांनी हरामीपणा केलाय ना. त्या हरामीपणा मागे डोकं पाकिस्तानचंच. ते आता ठेचलं पाहिजे.

Previous Post

पहलगाम हल्लयाचा जमियत उलेमा कडून जाहिर निषेध

Next Post

भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने कर्मचार्‍यास चिरडले

संबंधित बातम्या

बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post

भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने कर्मचार्‍यास चिरडले

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?