
पिंपळनेर, (रिपोर्टर)ः- बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नाथापूर येथे मंगळवारी मध्यराञी अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साडेतीन तोळे सोन्याची दागिने लंपास केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील नाथापुर येथील संतोष रामप्रसाद गिराम यांच्या घरात आई- वडील आणि पत्नी होती. पाठीमागील खोलीमध्ये आई -वडील झोपले होते. बेडरूम मध्ये कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास कपाट तोडून अंगठी, झुंबर वेल जोड, नथ, कानातील वेल, दीड तोळ्याचे गंठण यासह रोख रक्कम 14 हजार रुपये लंपास केले.
याची माहिती पोलिसांना मिळताच बीड येथून श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पोलिस उपअधीक्षक पूजा पवार यांनी घटनास्थळी येऊन तपासाच्या सुचना दिल्या. घरफोडी प्रकरणी पोलिसांत नोंद झाली आहे





