धुळे सोलापूर रोडवर आज सकाळी घडला अपघात
बीड, (रिपोर्टर)ः- भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने मोटार सायकलस्वरास जोराची धडक दिल्याने या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी धुळे सोलापुर रोडवरील राधिका हॉटेलच्या समोर घडली.
बाबुशा रामभाऊ कदम (वय 53 रा.येळंब) हे आज सकाळी 9 वाजता मांजरसुंब्यावरून येळंबकडे आपल्या मोटारसायकलवर जात होते. राधिका हॉटेलच्या समोर पाठीमागुन भरधाव वेगाने येणारा ट्रक एम.एच.14डी.एम.8805 ने जोराची धडक दिली. या अपघातात कदम हे जागीच ठार झाले. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






